(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे, कसबा कुंभारवाडी ते नायरी, तिवरे, निवळी रस्त्याच्या सव्वातीन कोटी रूपयाच्या डांबरीकरणाचा शुभारंभ चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सध्या कासव गतीने सुरू असून हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
गेल्या दोन महिन्यात जेमतेम काम दोन किलो मिटरचे BBM झाले आहे. या रस्त्याचे काम थांबल्याने फणसवणे पंचक्रोशी ग्रामस्थ पुन्हा आक्रमक होण्याच्या तयारीत असुन रस्त्याचे काम 15 एप्रिल 2022 पर्यंत चालू न झाल्यास शास्त्री पूल येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थानी जाहीर केले आहे
याच प्रकारे कसबा फणसवणे, नायरी रस्त्याची जास्त रकमेची निविदा जावेद खान नामक ठेकेदाराने भरली असुन सदर रस्त्याचे काम त्याच्याकडे आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मात्र जास्त रक्कम मिळुनही त्या रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने जागरूक ग्रामस्थानी काम बंद पाडले होते. त्यानंतर त्या रस्त्याचे झालेले BBM JCB लाऊन नव्याने परत डागडुजी करुन कामाला सुरवात करण्यात आली होती. मात्र अचानक या रस्त्याचे काम बंद करुन येथील कामगारांना घेऊन ठेकेदार गायब झाल्याने दोन महिन्यात १ किलोमीटरचे काम पुर्ण न झाल्याने 14 किलोमीटर अंतराचे काम पुर्ण करण्यासाठी या ठेकेदाराला किती वर्ष लागतील असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
या कामात दिरंगाई करणाऱ्या या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकुन संबंधित अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केली म्हणुन कायदेशीर करवाई करावी अशी मागणी होत आहे. कामाला सुरवात झाली नाही तर पुन्हा एकदा फणसवणे नायरी पंचक्रोशी ग्रामस्थ रस्त्यावर उतरून शास्त्रीपुल येथे रस्ता रोको करतील असा इशारा फणसवणे पंचक्रोशी संघर्ष समितीने दिला असुन याची पुर्ण जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख यांची असेल असे जाहीर करण्यात आले आहे.