(खेड / इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील सवेणी शिंदेवाडी येथे विद्युतभारित तारेचा स्पर्श होऊन चार म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक १८ जुलै रोजी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. यात रामचंद्र कृष्णा शिंदे या शेतकऱ्याचे ३ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सवेणी शिंदेवाडी येथील रामचंद्र शिंदे यांनी आपल्या चार म्हशी नेहमीप्रमाणे शेतात चरण्यासाठी सोडल्या होत्या. तेथे विद्युतभारित तारेचा स्पर्श म्हशींना झाला आणि चारही म्हशींचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून येथील विद्युत खांब गंजलेले होते. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. विद्युत खांबाचे ब्रॅकेट तुटल्यामुळे विद्युत भार जमिनीवर पडली होती. याच विद्युतभारित तारेचा स्पर्श शेतात चालणाऱ्या या म्हशींना झाला आणि त्यांचा तडफडून मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतरही तब्बल एक तास या विद्युतभारित तारेमध्ये वीज प्रवाह सुरू होता. शेतकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर एका तासानंतर वीजपुरवठा खंडित झाले आहे. करण्यात आला. या गावांमध्ये नियुक्त असलेले वायरमन या ठिकाणी राहत नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. तसेच गंजलेले विद्युत पोल बदलण्याची लेखी मागणीही गेल्या वर्षापासून येथील ग्रामस्थ महावितरणकडे करत असल्याचे समोर आले आहे. महसूल खात्याने या प्रकाराचा पंचनामा केला असून, शिंदे यांचे ३,७०,००० रुपयांचे नुकसानझालंय आहे