मुस्लिम वेलफेयर सोसायटी लांजा या संस्थेच्या वतीने कोरोनाच्या कालावधीत गोरगरीब जनतेला रमजान किटच्या माध्यमातून अन्नधान्य पुरविले जात असून आजतागायत राजापूर, लांजा व रत्नागिरी तालुक्यात 510 किट चे वाटप करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून स्थापन केलेल्या मुस्लिम वेलफेयर सोसायटी लांजा ही संस्था कोरोना काळात गोरगरिबांच्या पाठीशी देवदूता सारखी उभी राहिली आहे.
मार्च 2020 च्या लाॅकडाऊनच्या काळात मुस्लिम वेलफेयर सोसायटीने 1200 धान्याच्या किटचेट वाटप केले होते. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सोसायटी समाजासाठी सरसावली आहे. रमजान किटच्या निमित्ताने ती समाजापर्यंत गोरगरिबांना अन्न धान्यचे अखंडित वाटप करीत आहे. आता पर्यंत राजापूर, लांजा आणि रत्नागिरी या ठीकाणी 510 किट चे वाटप चालू आहे ह्या पुढेही चालू राहणार हा उपक्रम चालू ठेवणार.
ही या संपूर्ण कार्यात मुस्लिम वेलफेयर सोसायटी चे अध्यक्ष रफिक नाईक, कार्याध्यक्ष अकील नाईक,सचिव राजू नाईक,खजिनदार सईद खान, सटवली प्रभाग अध्यक्ष अब्दुल बरमारे, नूरा मुक्री, सोहेल मुक्री, हुसेन ठाणेदार, अरिफ घारे, आयेशा बागवान, दिलशाद नाईक तसेच अखंडित माल पुरवठा करणारे रघुनाथ कोपरे आणि अपना बाजार चे व्यवस्थापक उदय सावंत यांचे सहकार्य लाभल्याचे अकिल नाईक यांनी सांगितले.