(संगमेश्वर)
विश्व समता कलामंच लोवले, संगमेश्वर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र, रत्नागिरी व चंद्रकांत ऊर्फ बावा शेट स्मृतीगंध प्रतिष्ठान लोवले आयोजित “एक राल निळ्या पाखरांची…!” राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धा रविवार दि. 5 फेब्रुवारी 2023 रोजी सायं.7.00 वाजता आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून तब्बल 25 जलसा मंडळांनी सहभाग दर्शविला होता.
त्यामधील एक समता कलापथक चाटव अस्तान, ता. खेड, जि. रत्नागिरी या जलसा मंडळाने प्रथमच सहभाग दर्शवून उपस्थितांची मने जिंकल्याबद्दल प्रमुख पाहुणे तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने पूर्वीपासून चालत आलेल्या या जलसा मंडळाने आजवर अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक तथा वैचारिक क्रांती केली आहे.
गेल्या 30-40 वर्षांपासून आपले दैनंदिन कामकाज सांभाळून हे मंडळ दिवंगत कवी देवजी गायकवाड, नांदिवशे, ता. चिपळूण जि. रत्नागिरी. यांना गुरुस्थानी ठेवून त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहेत हे विशेष. दरम्यान सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे मुख्य संस्थापक तथा गायक आयु. मनोज तांबे, गायक सिद्धार्थ शिर्के, दिलीप यादव, हार्मोनियम वादक गुरूदास जाधव, ढोलकीवादक शांताराम तांबे, हरिश्चंद्र जाधव, कोरस- काशिराम जाधव, अनिल शिर्के अजित जाधव, जितेंद्र शिर्के, प्रमोद जाधव, रघुनाथ सावंत, भगवान जाधव, कृष्णा शिर्के यांनी लाख मोलाचे सहकार्य केले.