(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील समता प्रभोधन मंच, या संघटनेच्या वतीने 1 जानेवारी रोजी पाचल बाजारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भिमा-कोरेगावं येथील स्वातंत्र्य लढ्यात शाहिद झालेल्या शूरविरांना विनम्र अभिवादन करून 206 वा शोर्य दिन म्हणून साजरा करण्यात आला.
महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ भिमा कोरेगाव येथे विजय स्तंभ बांधण्यात आला आहे. या ठिकाणी दरवर्षी 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन अनुयायांकडून मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावर्षी राजापूर तालुक्यातील समता प्रबोधन मंच- राजापूर या संघटनेच्या वतीने पाचल बाजारपेठेत येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भिमा कोरेगावं येथील स्वातंत्र्यलढ्यात शाहिद झालेल्या शूरविरांना विनम्र अभिवादन करून 206 वा शोर्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना संघटनेचे सचिव रामचंद्र मोरे यांनी या दिनाचे महत्व सांगताना, 31 डिसेंबर 1817 व 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज व पेशवे यांच्यात भिमा नदीच्या तीरावर झालेल्या घनघोर लढाईत इंग्रजाच्या बाजूने लढताना 500 महार विरांनी 28,000 पेशव्यांच्या सैन्याला कसे सलो की पळो करून इंग्रजाना ती लढाई जिंकून दिली याबाबतचा इतिहास त्यांनी यावेळी सांगितला.
या शौर्य दिनाला व लढ्यातील वीरांना अभिवादन करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी, करक गावचे सरपंच प्रकाश दासवंत, पत्रकार सुरेश गुडेकर, माजी सभापती दत्ताराम गोरुले, महेश कोलते, संघटनेचे कोषाध्यक्ष प्रमोद जाधव, सल्लागार दत्तात्रय गायकवाड, योगेश पवार, मुबारक थोडगे, सुनील पवार, तेजस जाधव, अध्यक्ष तुषार पाचलकर उपस्थित होते.