(संगमेश्वर/सुरेश सप्रे )
कामगार दिनानिमित्त लोक निर्माण वृत्तपत्रातर्फ दिला जाणारा आदर्श पत्रकार लोक निर्माण सन्मान २०२२ च्या पुरस्कारासाठी संगमेश्वर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार व ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय खजिनदार सत्यवान विचारे यांची निवड झाली असल्याचे बाळकृष्ण कासार यांनी जाहीर केले आहे.
सत्यवान विचारे हे गेली अनेक वर्ष पत्रकारितेत आहेत त्यांनी आता पर्यंत अनेक सामाजिक प्रश्न हाताळले असुन कित्यकांना न्याय मिळवून दिला आहे, सडेतोड लिखाण हा त्यांचा हातखंडा असल्याने अनेकांची नाराजी ओढवून घेतली. आजही ते आपल्या सडेतोड वृत्तीने लिखाण करत असल्याने सर्वसामान्य माणूसाला न्याय मिळवून देत आहेत. राज्यात प्रकाशित होणाऱ्या साप्ताहीक, लोकनिर्माण या वृत्तपत्राचा आदर्श पत्रकार पुरस्कार विचारे यांना जाहीर झाल्याचे कळताच जिल्ह्यातून त्यांच्या वर अभिदनंदचा वर्षाव होत आहे.
सा. लोकनिर्माण चे पुरस्कार पुढील प्रमाणे सुनील जठार – सहसंपादक – रत्नागिरी, सत्यवान विचारे – संगमेश्वर प्रतिनिधी प्रमोद आंब्रे – उपसंपादक खेड या तिघांची निवड झाली झाली तर उत्तेजनार्थ प्रभाकर मोरे – रत्नागिरी सौ. राजश्री फुलपगार – ठाणे रविंद्र वाघोसकर – रायगड विनायक दोरगे – पुणे संजय नायर – कोल्हापूर या सर्वांची निवड करण्यात आली आहे. असुन रविवार १ मे 2022 रोजी सांयंकाळी देवरुख येथील माटे सभागृहात मान्यवारांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.