(चिपळूण)
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या हेतूने “कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी” या अभिनव उपक्रमाअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनी कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विदयालयाच्या इ.9वी मधील विद्यार्थ्यांनी खेर्डी आठवडा बाजार या ठिकाणी ज्या नागरिकांनी बाजारामध्ये प्लास्टिक पिशवी आणली होती. त्या सर्व नागरिकांना मोफत कापडी पिशवी वाटप करून प्रत्येकाने प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशवी वापरण्याचा संकल्प करूया असा सामाजिक संदेश देत स्वतः टाकावू साड्या, ओढण्या, जुने शर्टचे कापड इ पासून तयार केलेल्या 600 कापडी पिशव्यांचे वाटप करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
खेर्डी ग्रामपंचायत उपसरपंच श्री.विनोद भुरण, खेर्डी ग्रामपंचायत माजी सरपंच, व सदस्य श्री.प्रकाश पाथरवट, ग्रामपंचायत सदस्य श्री.राकेश दाभोळकर यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत विदयालयाने गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग घेतला त्या,साठी शुभेच्छा दिल्या. व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप करत फळ, भाजी, व किराणा माल विक्रेते व ग्राहक यांना कापडी पिशव्या वापरा असा संदेश दिला.
विदयालयाचे मुख्याध्यापकश्री.संजय वरेकर यांनी आपल्या मनोगतातून कापडी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती होणे काळाची गरज आहे,त्यामुळे प्रदूषणमुक्त वातावरण व लोकांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल असे सांगितले.या वेळी उपमुख्याध्यापक श्री.विश्वास दाभोळकर, श्री.प्रकाश वावरे, सौ.भाग्यश्री निर्मळ, श्री.अमोल कोतवाल, श्री.योगेश नाचणकर, कु.शर्मिला म्हादे उपस्थित होते.
विद्यालयातील सहभागी सर्व विद्यार्थी,व मार्गदर्शक शिक्षक यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष,आमदार श्री शेखरजी निकम, संस्थेचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब भुवड, संस्थेचे सेक्रेटरी श्री.महेश महाडिक, संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, उपमुख्याध्यापक श्री.विश्वास दाभोळकर, पर्यवेक्षक श्री.पांडुरंग काळूगडे व सौ.आसावरी राजेशिर्के, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, यांच्यावतीने कौतुक करण्यात आले.