( रत्नागिरी )
शहरातील सह्याद्रीनगर येथे सख्ख्या भावाने दारुच्या नशेत दुसऱ्या भावाच्या डोक्यात बॅट घालून जखमी केल्याची घटना २३ फेब्रुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित दत्तात्रय मराठे (४८. गुरुविहार सोसायटी, सह्याद्रीनगर, रत्नागिरी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर श्रीकांत दत्तात्रय मराठे (४४. गुरुविहार सोसायटी, सह्याद्रीनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित आणि श्रीकांत हे दोघे सख्खे भाऊ आहेत. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अमित मराठे है। कामावरुन घरी आले. थोड्या वेळाने श्रीकांत हा त्याच्या मित्राला घेऊन घरी आला. त्यानंतर दोघेही टेरेसवर जाऊन दारु पित होतो अमित हे घरामध्ये मुलीसोबत बोलत असताना अचानक आरोपी श्रीकांत हा बॅट घेऊन आला आणि त्याने अमित यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अमित यांच्या कपाळावर बॅट मारून जखमी केले. या मारहाणीत ते काळे निळे झाले. याचवेळी ते जमिनीवर पडले. त्यावेळी त्यांनी पोलिसांना फोन लावला पोलिसांनी अॅम्बुलन्स बोलावून रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले. बेशुध्दावस्थेत अमित हे असल्यामुळे औषधोपचारानंतर शुध्दीवर आल्यावर त्यांच्या तक्रारीनुसार श्रीकांत मराठे यांच्यावर भादविकलम ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.