(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे आयोजित गणपतीपुळे भक्तनिवास येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पठण स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला आहे.
गट १.(इ. पहिली- दुसरी )
प्रथम मुक्ता नितीन पळसुळेदेसाई
कृ.चि.आगाशे प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी.
द्वितीय -आराध्य नंदकुमार कुंभार
जिंदल विद्यामंदिर जयगड
तृतीय- सौमी सुशिल भुते
पूर्ण प्राथमिक शाळा निवेंडी खालची
गट-२ ( इ. तिसरी -चौथी)
प्रथम- वल्लरी विनायक मुकादम
कृ.चि. आगाशे ,रत्नागिरी
द्वितीय -मुक्ता अमोल फल्ले
कृ.चि.आगाशे ,रत्नागिरी
तृतीय- श्रीनिधी अतुल रानडे
प्राथमिक शाळा, गणपतीपुळे
गट ३ (इ. पाचवी- सहावी )
प्रथम – आर्या अतुल रानडे
ब.प .विद्यालय, मालगुंड
द्वितीय- निधी निलेश सागवेकर
माध्यमिक विद्यालय, जाकादेवी
तृतीय- निशांत अवधूत केळकर
जिंदल विद्यामंदिर, जयगड
गट ४ ( इ.सातवी-आठवी )
प्रथम- आदित्य अमोल फल्ले
संजीवन गुरुकुल पटवर्धन, हायस्कूल द्वितीय- श्रीयश श्रीहरी रानडे
ब.प. विद्यालय, मालगुंड
तृतीय – श्रीराज राकेश ओक
ब.प.विद्यालय,मालगुंड
गट ५ (इ.नववी- दहावी )
श्रीया अभिजीत केळकर
ब.प.विद्यालय मालगुंड
द्वितीय- अनय रामचंद्र घनवटकर
जिंदल विद्यामंदिर ,जयगड
तृतीय- प्रांजली सतिश बोल्ये
माध्यमिक विद्यामंदिर, जयगड
गट ६ ( इ.अकरावी -बारावी)
प्रथम – वेदश्री विक्रांत फडके
अभ्यंकर ज्युनिअर कॉलेज ,रत्नागिरी
द्वितीय -केतकी विवेक पुरोहित
अभ्यंकर ज्युनिअर कॉलेज, रत्नागिरी
तृतीय -आदित्य किशोर डांगे
बा. प. कदम कनिष्ठ महाविद्यालय,जाकादेवी
स्पर्धेचे उद्घाटन धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील जाणकार, रामभक्त श्री. गोरखनाथ रिसबूड (वय वर्ष ९२) यांच्या हस्ते गणपतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे दिपक जोशी, गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच श्री.विनायक राऊत ,खजिनदार श्री. अमित मेहेंदळे, सचिव श्री. विद्याधर शेंड्ये, गणपतीपुळे देवस्थानचे पंच डॉ. विवेक भिडे ,श्रीहरी रानडे उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन नीटनेटकेपणाने पार पडल्याने उपस्थित स्पर्धेक ,पालक ,शिक्षक,परीक्षक यांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणपतीपुळे संस्थान श्रीदेवचे सरपंच विनायक राऊत यांनी केले.
पठण स्पर्धेमुळे उच्चारण सुधारते. भाषेवर प्रभुत्व मिळविता येते, व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्यासाठी पठण स्पर्धा महत्वाची असल्याचे प्रमुख पाहुणे दिपक जोशी, रामभक्त गोरखनाथ रिसबूड यांनी मार्गदर्शक भाषणातून अधोरेखित केले. पुढील वर्षी पठण स्पर्धेचे स्वरूप संपूर्ण तालुकाव्यापी असणार असल्याचे संस्थान श्रीदेव गणपतीपुळेचे उपक्रमशील व अभ्यासू सरपंच श्री.विनायक राऊत यांनी सांगितले.ही स्पर्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.