(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये मोदी सरकारने संसदेत 33 टक्के महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्याचे समजताच संगमेश्वर तालुका भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. या जल्लोषाच्या वेळी भाजपा महिला रत्नागिरी जिल्हा चिटणीस सौ कोमल रहाटे, सौ नुपुरा मुळ्ये, सौ सुमन झगडे, मयुरी लिंगायत, अश्विनी भिडे, पूर्वा करमरकर, संगीता दांडेकर, शालिनी करमरकर आदि महिलांनी जल्लोष केला तसेच यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जयघोषाच्या घोषणा देण्यात आल्या.
फोटो : संसदेत महिलांना 33 टक्के महिला आरक्षण दिल्याचे समजताच संगमेश्वरमध्ये भाजपा महिलांच्यावतीने जल्लोष करताना महिला जिल्हा चिटणीस सौ कोमल रहाटे, नुपुरा मुळ्ये आदी
(छाया -मकरंद सुर्वे संगमेश्वर)