( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी अंतर्गत तालुका शाखा रत्नागिरी यांच्या विद्यमाने रविवार दि. ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर शेषाराम हॉल मारुती मंदीर रत्नागिरी याठिकाणी होणार आहे. तरी सर्व ग्रामशाखांचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास उपस्थित रहावे. असे आवाहन भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा रत्नागिरीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.