(मुंबई / किशोर गावडे)
संजय राऊत यांच्याविरोधात भांडुप रेल्वे स्टेशन पश्चिम येथे शिवसेनेने आंदोलन केले. राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून महिलांनी जाहीर निषेध व्यक्त केला. शिवसेनेच्या आमदार, खासदार व नेत्यांबद्दल अपशब्द बोलणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आज आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे माजी आमदार व ईशान्य मुंबई विभाग प्रमुख अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर यांच्या नेतृत्वाखाली राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध नोंदवण्यात आला. पत्रकारांसमोर थुंकून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा अवमान केल्याबद्दल संजय राऊत यांचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. राऊत यांनी वर्तनात सुधारणा केली नाही, तर प्रत्यक्ष त्यांच्या तोंडात जोडे मारून, तोंडावर थुकून त्यांचे तोंड काळे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
आज सकाळी 11 वाजता केलेल्या या आंदोलनात शिवसेना भांडुप विधानसभा संघटक नेहा पाटकर उपविभाग प्रमुख प्रकाश माने, संजय दुडे, भूषण पालांडे, देवा जाधव, तसेच महिला उपविभाग प्रमुख अंजली घाडीगावकर, वर्षा मंडलिक, शाखाप्रमुख संजय शिंदे, अमित डिचोलकर,प्रकाश सकपाळ विजय कदम, संदीप कुंभार, अनिल माने, कार्यालय प्रमुख अजित धोत्रे व सर्व महिला शाखाप्रमुख, शाखासंघटक, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख व अनेक महिला यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारून, लाथांनी त्यांची प्रतिमा तुडवून, प्रतिमेवर थुंकून संजय राऊत यांचा जाहीर निषेध नोंदवला. यावेळी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्ते, महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.