(मुंबई)
जामीन रद्द करण्याची मागणी करणार
दीपक केसरकर यांनी संजय राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊत दोन हजार कोटींचा जो आरोप करत आहेत, त्यावर रितसर केस दाखल व्हायला हवी. आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यासंदर्भात निर्णय झाला आहे. पक्षाच्या विरोधात ते काम करत आहेत, पक्षाच्या हिताच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे त्यांचे राज्यसभेचे त्यांचे सदस्यत्व का रद्द करु नये, या संदर्भात एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यावर संजय राऊत यांना नोटीस दिली गेली पाहीजे, असे आपले मत असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात प्रस्ताव आणून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना लगाम बसविण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच ईडीने त्यांना जामीन देत असताना काही अटी-शर्ती घातलेल्या आहेत. तरीही ते आपल्या वक्तव्यातून भीती निर्माण करत आहेत. त्यामुळे आम्ही रितसर न्यायालय, ईडी आणि सरकारडे तक्रार करुन त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहोत. अतिशय घाणेरड्या भाषेत ते बोलत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असे दीपक केसरकर म्हणाले.