( संगलट-खेड / इक्बाल जमादार )
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे दलित बहुजनांचे संघर्षनायक लोकनेते असून त्यांचा वाढदिवस दि.25 डिसेंबर देशभर संघर्षदिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांतभाई सकपाळ यांनी केले आहे. खेड तालुकास्तरीय जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पक्षाचे संपर्क प्रमुख सुशांत सकपाळ तालुका स्तरीय आयोजित बैठकीत सुशांत भाई सकपाळ बोलत होते.
यावेळी रिपाइंचे खेड तालुका अध्यक्ष संतोष कापसे, जिल्हा संपर्क प्रमुख गौतम तांबे सवणकर तसेच जिल्हा कोषाध्यक्ष मिलींद तांबे तळवटकर कार्यध्यक्ष मिलिंद तांबे,कोषाध्यक्ष सरचिटणीस सुरेंद्र तांबे, गौतम जाधव, संघटक सचिव विजय गमरे, युवक अध्यक्ष विकास धोत्रे, सरचिटणीस प्रा संदीप तांबे, उपाध्यक्ष बाळकृष्ण देवळेकर, गोपीनाथ जाधव, सखाराम सकपाळ, युवक जिल्हा संपर्क प्रमुख गणेश शिर्के, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र तांबे, शहर अध्यक्ष दिपेंद्र जाधव, केवल सोनावणे, सुधीर जाधव, विनय तांबे, प्रशांत गमरे, रोशन धोत्रे, सूरज तांबे, विशाल तांबे, सतीश तांबे, प्रफुल्ल तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे संघर्षनायक लोकनेते म्हणुन लोकप्रिय असून त्यांचा वाढदिवस दि.25 डिसेंबर रोजी दरवर्षी संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होतो. यंदाही मोठया उत्साहात लोकोपयोगी उपक्रम कोकणात राबवून रिपाई तर्फे देशभर संघर्षनायक रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कोकणसह महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये रिपाइं तर्फे ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, अन्नदान, थंडीत गरम कपडे, स्वेटर, ब्लॅंकेट वाटपनआदी लोकोपयोगी उपक्रम रिपाइं तर्फे राबवून संघर्षदिन साजरा होणार असल्याची माहिती रिपाइं चे कोकण संपर्क प्रमुख सुशांतभाई सकपाळ यांनी यावेळी दिली आहे.