( संगलट – खेड )
खेड तालुक्यातील संगलट गावातील माजी सरपंच हसन अफवारे यांचा राहत्या घरी दुपारी बारा वाजता दुःख निधन झाले. हसन अफवारे हे मनमिळावू व्यक्ती होती. त्यांच्या वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले गेले. गेली काही वर्षे ते आजारी होते
चिपळूण मुस्लिम समाजाचे कार्याध्यक्ष नाझीम भाई अफवारे यांचे ते वडील होत. तसेच जेष्ठ पत्रकार इकबाल जमादार यांचे मामा आहेत. हसन अफवारे यांनी संगलट गावामध्ये अनेक वर्ष पोलीस पाटील तसेच सरपंच व विशेष कार्यकारी अधिकारी तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष अशी अनेक पद भूषवली होती. त्यांचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचय म्हणून मामू म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने संगलट गाव आज पोरका झाला आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. त्यांच्या पश्च्यात मुले मुलगी नातवंडे असा परिवार आहे