खेड तालुक्यातील अति महत्त्वाची आणि प्रतिष्ठित असलेल्या संगलट गावामध्ये निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात आलेल्या यंत्रातील चीप बदलली गेल्याची लेखी तक्रार ग्रामस्थांनी बुधवारी (ता. २१) खेड तहसीलदार यांच्यासह निवडणूक आयोगाकडे केली आहे.
खेड तहसील कार्यालयात बुधवारी (ता. २१) नितिन डेरवणकर, साबीर कौचाली, सिफा नाडकर, बबन चिनकटे, फरहीन कौचाली (सर्व रा. संगलट ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केल्यानुसार २०२२ सार्वत्रिक निवडणूक मौजे संगलट येथे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानासाठी वापरण्यात आलेल्या बॅलेट मशीनचे चीप मतमोजणी प्रसंगी बदलण्यात आली आहे, असे नमूद करण्यात आली आहे.
१८ डिसेंबरला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मौजे संगलट येथे प्रभाग क्र. १ मधील मतदान यंत्रामधील जो सुरवातीला चीप नंबर देण्यात आला होता. तोच चीप नंबर हा मतदाना अगोदर पेट्या सील करतेवेळी होता; परंतु मंगळवारी (ता. २०) खेड तहसील कार्यालयात मत मोजण्यापूर्वी ज्या वेळेस मतदान यंत्राचा नंबर देण्यात आला, त्या वेळेस तो वेगळा होता. त्यामुळे हा नंबर बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले असून निवडणुकीसाठी ही बाब खूप गंभीर आहे. त्याचा परिणाम थेट सरपंच निवडणुकीवर झालेला दिसून येत आहे. तसेच त्यांचे सहयोगी सदस्य यांच्यावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकाराची संपूर्ण सखोल चौकशी करावी व पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !