( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात एकदिवसीय नामसप्ताह आज 11 जुलै रोजी मानकरी, गावकरी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
आषाढी एकादशी निमित्त रविवार 10 जुलै रोजी विठ्ठल मंदिरात पहाटे काकडा आरती, पुण्याहवाचन, आरती आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता एकदिवसीय नाम सप्ताहाला सालीम, खापरे, सनगरे, शिगवण, पाताडे या मानकर्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. पाताडे वंत यांच्यातर्फे विठ्ठल मंदिरापर्यंत वाजत गाजत दिंडी काढण्यात आली. विठ्ठल दर्शनासाठी कानरकोंड, मानसकोंड, उक्षी, बावनदी, पोचरी, परचुरी येथील भाविकांनी दर्शन घेतले.
सोमवार 11 जुलै रोजी दुपारी 12 वाजता नामसप्ताहाची सांगता करण्यात आली. त्यानंतर विठ्ठलाची आरती आणि नवस झाल्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.