( मकरंद सुर्वे / संगमेश्वर)
मुंबई – गोवा महामार्गावरील धामणी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी कार यांच्यात झालेल्या अपघातात एकजण जखमी झाल्याची घटना 14 जून रोजी सायंकाळी 4.50 वाजता घडली. तानाजी गुणाजी दोरकडे (50, राहणार आंबेड खुर्द बोलेवाडी ) असे जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या बलेनो कार (MH 46 BE 3840 ) ने दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तानाजी दोरकडे जखमी झाले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहीती मिळताच ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथील जगदगुरु नरेद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धामची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमीना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.