(फुणगूस/एजाज पटेल)
संगमेश्वर येथील प्रतिष्ठित नागरिक भिकाजी गोविंद शेट्ये यांचे 29 मे रोजी वृधपकाळाने वयाच्या एकान्नव्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच संपूर्ण संगमेश्वर शहरात शोककळा पसरली.
संगमेश्वर शहरासह संपूर्ण तालुक्यात सामाजिक क्षेत्रात धडाडीने अग्रेसर राहणारे प्रतिष्टीत म्हणून प्रख्यात असलेले सर्वांचे आबा म्हणजेच भिकाजी गोविंद शेट्ये यांनी रविवार दिनांक 29 मे रोजी वयाच्या एकान्नव्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याची वार्ता हा-हा म्हणता संगमेश्वर शहरासह संपूर्ण तालुक्यात पसरताच सर्वत्र शोककळा पसरली.
सामाजिक व राजकीय क्षेत्रापासून ते सर्वसामान्य स्तरातून त्यांच्या अंतिम दर्शन व कुटुंबाचे सांत्वन करण्याकसाठी अनेकांनी हजेरी लावली. आबा यांचे अंत्यसंस्कार संगमेशर देवरुख मुख्य मार्गावरील मारूती मंदिर शेजारील स्मशानभूमीत करण्यात आले.
आबा उर्फ भिकाजी शेट्ये यांच्या पश्चात त्यांचा पत्नी तीन मुली दोन मुलगे सुना जावई आहेत.