(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वरची कु.निहाली अभय गद्रे हिने शास्त्रीय संगीतातील संगीत अलंकार ही पदवी प्राप्त केली आहे. याबद्दल तिचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
वयाच्या दहाव्या वर्षापासुन निहालीने शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. देवरुख येथील ललीत कला अँकॅडमी मध्ये सौ. संगीता बापट या गुरुंकडे तीने प्राथमिक शिक्षण घेतले. रत्नागिरीच्या सौ. मुग्धा भट- सामंत यांचेकडे तीने पुढील शिक्षण घेत २०१९ मध्ये निहालीने संगीत विशारद पदवी प्राप्त केली. कोरोना काळात तीने ऑनलाइन शिक्षण सुरुच ठेवले होते.
निहाली गद्रे हीने संगमेश्वर सारख्या छोट्याशा गावात राहून आपल्या गायनाची आवड जपत आणि संगीताचे क्लास घेत स्वतः संगीतातील अलंकार पदवी प्राप्त करणाऱ्या निहाली अभय गद्रे हिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सौ. अर्चिता कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार करताना निहाली ही संगमेश्वरची शान आहे असे गौरवोद्गार काढण्यात आले. निहालीने आपली आवड जोपासत आणि या क्षेत्रात प्रगती केल्याबद्दल तिचे उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर, श्री. दिनेश अंब्रे (पत्रकार), सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विशाल सपटे, या सर्वांनी तोंडभरून कौतुक केले. यासोबत निहालीला सांगितिक प्रवासासाठी प्रोत्साहन देणाऱ्या आई दिप्ती आणि वडील अभय गद्रे यांच्याबद्दलही गौरवोद्गार काढण्यात आले.
कोल्हापूर देवलक्लब येथे निहालीने संगीत अलंकारसाठी परीक्षा दिली व तीने संगीत अलंकार पदवी प्राप्तही केली. कमी वयात तीने हे यश साध्य केले आहे. निहाली ‘स्वरनिहाली’ हा अभंग व नाट्यगीतांचा कार्यक्रम करते.