(संगमेश्वर/विशेष प्रतिनिधी)
भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव अनुषंगाने संगमेश्वर पोलीस ठाणे व लायन्स क्लब संगमेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने “रन फॉर अमृतमहोत्सव” या निमित्ताने संगमेश्वर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 12 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. संगमेश्वर एस . टी . स्टँड परिसर, देवरुख रोडवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला कोल्हापूर, सिंधुदूर्ग, ठाणे, गुहागर, चिपळूण, दापोली, संगमेश्वर येथील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता.
या स्पर्धेत पुरुष खुला गट १० कि.मी. , महिला खुला गट ०५ कि.मी. , पुरुष लहान गट ( १३ ते १८ वर्षे ) ०५ कि.मी., महिला लहान गट (१३ ते १८ वर्षे) ०३ कि.मी. या वयोगटातील स्पर्धेचे आयोजन केलेले होते. तसेच सदर स्पर्धेचे खास आकर्षण म्हणून ज्येष्ठ नागरिक या गटाचेही ०२ कि.मी. स्पर्धा घेण्यात आल्या. चारही गटातील प्रथम पाच क्रमांक विजेत्यांना रोख रक्कम, मेडल व प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सदर मॅरेथॉन स्पर्धेकरीता रत्नागिरी, सिंधुदूर्ग , रायगड, ठाणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्हयातील एकूण ५८० स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा कालावधीत कु. समिक्षा वाडकर, रा. निढळेवाडी हिने देशभक्तीपर गीते व आकार ऑर्गनायझेशन देवरुख यांचेवतीने देशभक्तीपर गाण्यांवर डान्स कार्यक्रम करण्यात आला.
स्पर्धेतील क्रमांक
पुरुष मोठा गट ( १० किमी ) :
प्रथम – स्वराज जोशी (चिपळूण) रु .१०,००० / – रोख रक्कम, मेडल व प्रशस्तीपत्र
द्वितीय क्रमांक – महादेव कोळेकर (चिपळूण) रु .७००० / – रोख रक्कम , मेडल व प्रशस्तीपत्र
तृतीय क्रमांक विकास राजभर (ठाणे) रु .५००० / – रोख रक्कम , मेडल व प्रशस्तीपत्र
चतुर्थ क्रमांक आयुष घाणेकर (चिपळूण) रु .१५०० / – रोख रक्कम व प्रशस्तीपत्र
पाचवा क्रमांक ऋतुराज हुमने (चिपळूण) रु .१००० / – रोख रक्कम व प्रशस्तीपत्र
पुरुष लहान गट (5 किमी)
प्रथम क्रमांक : संजय झाकणे (चिपळूण) रु .५००० / – रोख रक्कम , मेडल व प्रशस्तीपत्र
द्वितीय क्रमांक : करण शर्मा (ठाणे) रु .३००० / – रोख रक्कम , मेडल व प्रशस्तीपत्र
तृतीय क्रमांक : ओंकार बैकर (चिपळूण) रु .२००० / – रोख रक्कम , मेडल व प्रशस्तीपत्र
चतुर्थ क्रमांक : संदीप पाल (रायगड) रु .१५०० / – रोख रक्कम , मेडल व प्रशस्तीपत्र
पाचवा क्रमांक : अक्षय पडवळ (संगमेश्वर) रु .१००० / – रोख रक्कम , मेडल व प्रशस्तीपत्र
महिला मोठा गट (5 किमी)
प्रथम क्रमांक : साक्षी जड्यार (चिपळूण) रु .५००० / – रोख रक्कम , मेडल व प्रशस्तीपत्र
द्वितीय क्रमांक : प्रमिला पाटील (चिपळूण) रु .३००० / – रोख रक्कम व प्रशस्तीपत्र
तृतीय क्रमांक : निकिता मरले (चिपळूण) रु .२००० / – रोख रक्कम व प्रशस्तीपत्र
चतुर्थ क्रमांक : साक्षी पवार (चिपळूण) रु .१००० / – रोख रक्कम व प्रशस्तीपत्र
पाचवा क्रमांक : साक्षी नवाले (दापोली) रु .१००० / – रोख रक्कम व प्रशस्तीपत्र
महिला लहान गट (3 किमी)
प्रथम क्रमांक : हुमेरा सय्यद (चिपळूण) रु .३००० / – रोख रक्कम , मेडल व प्रशस्तीपत्र
द्वितीय क्रमांक : अनुजा पवार (चिपळूण) रु .२००० / – रोख रक्कम व प्रशस्तीपत्र
तृतीय क्रमांक : कोमल रेवाळे (संगमेश्वर) रु .१००० / – रोख रक्कम व प्रशस्तीपत्र
चतुर्थ क्रमांक : संजना हरावडे (दापोली) रु .५०० / – रोख रक्कम व प्रशस्तीपत्र
पाचवा क्रमांक : करीना आदावडे (गुहागर) रु .५०० / – रोख रक्कम व प्रशस्तीपत्र
स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षिस वितरण प्रसंगी डॉ. श्री . मोहित कुमार गर्ग (पोलीस अधीक्षक, रत्नागिरी), सदाशिव वाघमारे ( उपविभागीय पोलीस अधिकारी), श्री. उदय झावरे (पोलीस निरीक्षक संगमेश्वर), श्री. सतिश पटेल (अध्यक्ष लायन्स क्लब संगमेश्वर ), श्री. संदीप तावडे (अध्यक्ष हौशी अॅथलेटीक संघटना, रत्नागिरी), विवेक शेरे ( माजी सरपंच नावडी), जमुरत अलजी (माजी सरपंच कुरंधुडा) श्री. प्रमोद शेटये (अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघटना), इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच संगमेश्वर हद्दीतील क्रीडा शिक्षक, एन.सी.सी. विद्यार्थी, सामाजिक संघटना, पोलीस पाटील, ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर, संगमेश्वर एस. टी. आगार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेकरीता मोलाचे सहकार्य लाभले त्यांचे आभार मानण्यात आले.