( संगमेश्वर / प्रतिनिधी )
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने 6 जणांनी एका मारहाण केल्याची घटना 18 ऑक्टोबर रोजी संगमेश्वर येथे घडली होती. या मारहाण प्रकरणातील 6 जणांवर संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने तरुणाला संगमेश्वर बाजारपेठेतील साई मेडिकलमध्ये घुसून शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच दमदाटी करुन दोन राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण केली. याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक नंदकुमार चव्हाण (शिवणे, तेर्ये, संगमेश्वर), जितेंद्र चव्हाण, अनुराग कोचिरकर, शेखर नलावडे, सनी प्रसादे, सलमान अल्लीहुसेन बोदले (सर्व रा. संगमेश्वर) यांच्यावर शांततेचा भंग केल्याप्रकरणी भादविकलम 143, 145, 147, 149, 452, 504, 506 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1), (3), 110/117, 112/117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जोशी यांनी पोलीस स्थानकात दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार पी. एस. शिंदे करत आहेत.