( संगमेश्वर )
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पुंभारवाडी येथे बेकायदेशी गावठी हातभट्टीवर संगमेश्वर पोलिसांनी धाड टाकून नवसागर मिश्रीत कुजके रसायन उद्ध्वस्त केले. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 11 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाळू राजाराम पुंभार (45, माखजन, पुंभारवाडी, संगमेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना 2 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माखजन पुंभारवाडी येथे बेकायदेशीर हातभट्टीची दारु विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून 1100 रुपये किंमतीचा नवसागर, 420 रुपये किंमतीची हातभट्टीची दारु, 9600 रुपये किंमतीचा 150 किलो गुळ व कुजके रसायन असा एकूण 11 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी बाळू पुंभार याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ब, क,ड,फ, ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.