(संगमेश्वर/प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे अज्ञाताने एका डॉक्टरला गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. वीजबिल अपडेट न केल्याने वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल, असा मेसेज व्हॉट्सअपवर आल्यानंतर समोरील व्यक्तीने डॉक्टर याना एक लिंक पाठवली. या लिंकवरून आपली अकाउंटची माहिती दिल्याने 24 हजार 799 हजाराची ऑनलाईन फसवणूक केली. याबाबतची फिर्याद डॉ. मयुरेश विलास पुरोहित यांनी संगमेश्वर पोलिस स्थानकात दिली. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मयुरेश विलास पुरोहित यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर वीजबिल अपडेट न केल्याने वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल, असा मेसेज आला.
28 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान मयुरेश यांच्या पत्नीचे मोबाईलवर आलेला मेसेज हा मेसेज तिने पती मयुरेश यांना फॉरवर्ड केल्यानंतर त्यांनी त्या नंबरवर कॉल केला असता समोरच्या व्यक्तीने वीजबिल अपडेट करण्यासाठी लिंक पाठवत आहे, असे सांगत 10 रुपये भरण्यास सांगितले. मयुरेश याने लिंकद्वारे 10 रुपये भरले. त्यानंतर त्यांच्या खात्यामधून 10 हजार, 9 हजार 999 व नंतर 4800 रुपये डेबिट झाल्याचे 3 मेसेज आले. आणि अकाऊंटमधून 24 हजार 799 रुपये ऑनलाईन काढल्याचे लक्षात आहे. आपली फसवणूक झाली लक्षात आपल्यानंतर त्यांनी बँक ऑफ इंडिया शाखा, कडवईमध्ये जाऊन आपले अकाऊंट लगेच बंद केले.
या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.