(देवरुख / सुरेश सप्रे)
भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने जाहीर झालेल्या कार्यकारणी मध्ये भडकंबा गावचे भाजप डॅशिंग कार्यकर्ते शंकर लाड यांची तालूका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, प्रमोद अधटराव,अमित केतकर, मार्गदर्शनाखाली या पदाचा वापर पक्षवाढ करण्यासाठी करणार असल्याचे शंकर लाड यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ते पोलीस संरक्षण संस्था सचिव, असंघटित कामगार कोकण प्रदेश अध्यक्ष आहेत.
याआधी त्यांनी भाजप ओबीसी सेल संगमेश्वर तालुका अध्यक्ष, भडकंबा तंटामुक्ती अध्यक्षपद भूषविलेले आहे. लोकांसाठी धडपडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.