(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील पाष्टेवाडी भडकंबा येथे 25 वर्षीय नवविवाहितेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद देवरुख पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. रितिका रुपेश कलये (25) असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मृत महिलेचा पती रुपेश पर्शुराम कलये (23, पाष्टेवाडी, भडकंबा) याने पोलीस स्थानकात दिली. ही घटना 1 जुलै रोजी सायंकाळी 6.45 वा. च्या सुमारास घडली. लग्नानंतर केवळ 6 महिन्यातच ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितिका हीचे 26 डिसेंबर 2021 लग्न झाले होते. त्यांना दमा आजाराचा त्रास होता. 30 जून रोजी त्यांच्या हातापायांना मुंग्या येत होत्या म्हणून पती रुपेश यांनी पाथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे दाखल केले. तेथे उपचार सुरु असतानाच 1 जुलै रोजी सायंकाळी 6.45 वा. च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले.