( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर बुरंबी येथे पाडचाऱ्याला मागून धडक देत मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकाविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील सुहास ब्रीद ( ३३ वर्षे , रा . तांबेडी , ब्रीदवाडी , ता . संगमेश्वर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. या अपघातात श्रीराम बारका भुरवणे (६० वर्षे , रा . तेथे गेल्येवाडी , ता . संगमेश्वर ) यांचा मृत्यू झाला होता. याबाबतची फिर्याद रमेश भुरवणे यांनी संगमेश्वर पोलिस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वा. चे सुमारास श्रीराम बारका भुरवणे हे तेथे बुरंबी स्टॉप येथून तेऱ्ये गेल्येवाडी असे देवरूख ते संगमेश्वर रोडवरून चालत असताना राखाडी रंगाची इको गाडी ( एमएच ०२ / डीजे / ३३०४) वरील चालक स्वप्नील सुहास ब्रीद याने अतिवेगात चालवून श्रीराम भुरवणे यास पाठीमागून जोरदार ठोकर दिली. यात श्रीराम भुरवणे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालक स्वप्नील ब्रीद याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.