(संगमेश्वर)
गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असल्याने बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. गणपती सजावटीसाठी साहित्य खरेदी करत आहेत. संगमेश्वर बाजारपेठेतील काहि दुकाने सजावट साहित्यांनी फुलून गेली आहेत. यामध्ये वैविध्यपूर्ण आकर्षक फुलांच्या माळा व लटकन, झिरमिळ्या, लॉन, फुलासह आकर्षक कमानी कमानी, कुंदन टिकल्यांचा वापर केलेले झुंबर असे विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे.
गणेशोत्सवासाठी आकर्षक अशा फुलांच्या माळा आल्या आहेत. दुकानाबाहेर लटकवलेल्या या रंगबेरंगी फुलांच्या माळा या नागरिकांना आकर्षित करत आहेत. विविध रंगांतील झिरमिळ्या व लॉन सजावट साहित्यात मागे किंवा जमिनीवर लावण्यात येणारे आणि गवतासारखे दिसणारे प्लॅस्टिकचे लॉन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सजावट अधिक आकर्षक आणि भरीव दिसावी यासाठी विविध रंगातील झिरमिळ्या उपलब्ध आहेत. क्रिस्टल लाकडी, रेशीम, सुती धाग्यातील लटकन बाजारात सजावटीसाठी उपलब्ध आहेत. सोनेरी आणि चंदेरी रंगातील क्रिस्ट वेलचे लटकन विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. यावर्षी सजावट साहित्यात १५ ते २० टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.