(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर पोलीस ठाण्यात घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी चोरट्यावर 454,457, 380 अन्वये घरफोडी च्या गुन्ह्या दाखल करण्यात आला होता. अज्ञात चोरट्याचा सुगावा लावण्याकरिता, 31 जानेवारी रोजी, रत्नागिरी पोलीस श्वान पथकातील श्वान टॅम्बो यास पाचारण करण्यात आले होते, त्यानुसार घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तूंचा वास त्याच्या हँडलेटद्वारे देण्यात आला.
हा वास घेताच श्वान टॅम्बो ने घटाच्या मागील दरवाजाने बाहेर पडून 360 मिटर च्या अंतापर्यंत माघ काढून इशारा दिला. ही संपूर्ण प्रक्रिया संपल्या नंतर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण देशमुख, संगमेश्वर पोलीस ठाणे यांनी या श्वान व तपास पथकास जवळच झालेल्या अन्य एका चोटीच्या गुन्ह्याची माहिती दिली व घटनास्थळी लागलीच जाण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे घटनास्थळी हे पथक पोहचले व श्वान टॅम्बो यास घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तूंचा त्याच्या हँडलेटद्वारे, गंध देण्यात आला.
हा गंध घेताच श्वान टॅम्बोने घटाच्या मुख्य दरवाजाने बाहेर पडून व अंगणाद्वारे गुटाच्या गोठ्या जवळील पायवाटेने 35 मिटर अंतरावर राहत असणाऱ्या श्री सोमा विश्राम ओकटे यांच्या घरात जाऊन श्वानने इशारा दिला.
श्री. सोमा विश्राम ओकटे यांच्यावर संगमेश्वर पोलीसांचा पूर्वीपासून संशय होताच व श्वान टॅम्बोने यावर शिक्कामोर्तब केला. यावरून संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नं. 13/ 2023 भा.द.वि.सं. कलम 454,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी सोमा विश्राम ओकटे यास ताब्यात घेण्यात आले व गुन्ह्यात चोटीस गेला मुद्देमाल 260,000/- रोख, ही 100% हस्तगत करण्यात आली आहे.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार / श्वान यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये श्री. प्रवीण देशमुख, (स.पो.नि. संगमेश्वर पोलीस ठाणे), श्रीमती. मढवी, (स.पो.नि., श्वान पथक, रत्नागिरी), पो. हवा / सचिन कामेटकर (संगमेश्वर पोलीस ठाणे), पो. हवा / 922 घुगटे, (चालक, श्वान पथक, रत्नागिरी), पो. हवा / 317 राणे (श्वान हॅडलेट, श्वान पथक, रत्नागिरी), पो. हवा / 831 आंब्रे ( श्वान हँडलेट, श्वान पथक, रत्नागिरी) व श्वान टॅम्बो श्वान पथक, रत्नागिरी याच्या सहाय्याने ही कामगिरी करण्यात आली.