( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
संगमेश्वर जवळील निढळेवाडी येथे सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रकने क्रुझर गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात क्रुझर वाहनातील चार जण जखमी झाले.
सविस्तर वृत्त असे की, गणपतीपुळे ते रायगड असा क्रुझर गाडीने पर्यटक जात होते. सागर साहेबराव दराके ( साखळी बुद्रुक बुलढाणा ) हा गाडी चालवत होता. महामार्गने जात असताना संगमेश्वर निढळेवाडी येथे हॉटेल मैत्री पार्क समोर आता असता मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने अशोक ले लँड कंपनीचा ट्रक चालक अरविंदभाई जयसिंगभाई बारिया घेऊन जात होता. त्याने क्रुझरला जोरदार धडक मारली. यामध्ये क्रुझर गाडी मधील विकास नारायण उगले, विजय देवदास उगले, भरत सूर्यभान उगले, अंकुश रामभाऊ ( सर्व राहणार बुलढाणा) हे जखमी झालेले आहेत. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.