(प्रतिनिधी/संगमेश्वर)
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडी येथे मंगळवारी रात्री 8 वा. च्या सुमारास दुचाकीने आराम बसला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
सविस्तर वृत्त असे की, कुरधुंडा येथील दिलावर उस्मान हाजू हे आपल्या ताब्यातील दुचाकीवरून घरी कुरधुंडा येथे जात होते. ते निढळेवाडी येथे आले असता अवघड वळणावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. याचवेळी रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणार्या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. येथील ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे दाखल केले. या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे करत आहेत.