(मकरंद सुर्वे /संगमेश्वर)
संगमेश्वर नावडी मधील 150 वर्षाची परंपरा असलेल्या श्री निनावी देवीचा नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. संगमेश्वर गावांच्या मध्यस्थानावरती नावडी (भंडारवाडा) येथे माता श्री निनावी देवीचे मंदिर आहे. निनावी देवी प्रासादिक मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवात घटस्थापना, तसेच अखंड हरीनाम सप्ताह व वर्ष भरात विविध धार्मिक परंपरेनुसार होणारे कार्यक्रम संपन्न केले जात आहेत. नवरात्रोत्सवात श्री निनावी देवीचे अलौकीक महत्व आहे. येथे माहेरवाशिणी येऊन ओट्या भरतात, नवस बोलून गाऱ्हाणे मांडून कुटुंबात सुख शांतीची याचना करतात.
रात्रौ आरती नंतर भोपल्या व नाच होत असतो. ‘ज्ञानोबा, तुकाराम’ नामाचा जयघोष करीत एक जागर करता-(अखंड हरीनाम सप्ताहाची सात दिवस विभागणी केली जाते. संगमेश्वरातील अनेक गट एकत्र येऊन हा कार्यक्रम करीत असतात. गेली अनेक वर्ष किसन हरिश्चंद्र सुर्वे यांनी गेली 56 वर्ष ही परंपरा सांभाळली होती त्यानंतर मानकरी दत्ताराम उर्फ बाबा सुर्वे यांनी गेल्या 30 वर्षांपासून ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे.