संगमेश्वर शहरात महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने गणेश चतुर्थीच्या दिवशी पुन्हा जोरदार हजेरी लावत शहरवासीयांना ओलेचिंब करून टाकले. जोरदार पावसाने शास्त्री नदी मोठ्या प्रवाहात वाहू लागली आहे. शुक्रवारी (दि.९) दुपारपासून सुरू असलेल्या पावसाची तिन तास जोरदार बॅटिंग सुरू होती. या पावसाने पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
जोरदार पावसामुळे शहरालगतच्या ग्रामीण भागालाही पावसाने झोडपले. पावसामुळे सोनवी आणि शास्त्री नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नदीजवळच्या वस्त्यांना धोका उद्भवू शकतो.
सुमारे तीन ते चार तास पाऊस कोसळत होता. या पावसामुळे अनेकांची धावपळ झाली. मात्र मुसळधार पाऊस कोसळत असला तरीही या जोरदार पावसाने शहरवासीय सुखावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरवासीय पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. आता समाधानकारक पाऊस पडत आहेत, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत.
भर पावसात गणरायाला भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!! असा जयघोष करत ढोल-ताशे वाजंत्रिची मिरवणूक, गुलालांची उधळण करीत भर पावसात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. सप्तलिंगी शास्त्री आणि सोनवी या नद्यांवर अनेक ठिकाणी विसर्जनाची सुविधा करण्यात आली होती. शहरासह अन्य ठिकाणी गणेश मूर्तीच्या विसर्जनाची भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांचा विसर्जनाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी उशिरपर्यंत गणेशमूर्तीचां विसर्जन सोहळा सुरू होता.
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !