(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यात पावसाचा जोर कायम असुन काही भागात नदीचे पाणी घुसले आहे तर काही भागात भूत्खलन, दरडीचा धोका कायम आहे. प्रशासनाने ठिकठिकाणी जावून पाहणी केली आहे व तसे नियोजन केले असल्याची माहीती तहसीलदार अमृता साबळे यांनी दिली. खडीओझरे गुरववाडीत दरड कोसळण्याचा संभव असल्याने तेथील नागरीकांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. रोज राञी दोन माणसे लक्ष ठेवत असतात. काही घटना घडते आहे, असे कळताच घंटा वाजवून नागरीकांना सावध करण्यात येणार आहे. गरजेच्या वस्तु नेहमी जवळ ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
गुरववाडीत ७ घरे, १६ नागरिक, बौद्धवाडीत १६ घरे २७ नागरीक रहात आहेत. काही घरे सुरक्षित आहेत तीथे नागरीक राञी वस्तीला जात आहेत. कोळंबे आंबेकरवाडीतील नागरीकांना कोळंबे वसतीगृहात सोय करण्यात आली आहे. माखजन बाजारपेठेत पाणी आहे. तेथील व्यापारीवर्ग सुरक्षित ठिकाणी गेला आहे. वाशी धरणाजवळ कालवा मातीने भरला होता ती माती काढण्यात आली आहे. धरण देखभाल करणारे इंजिनीयर यांनी पाणी वेगळ्या ठिकाणाहुन सोडल्याने धोका टळला आहे. गडनदी व कासे पुल येथेही लक्ष ठेवण्यात आले आहे. देवरुख महसुल कर्मचारी, देवरुख व संगमेश्वर,चिपळुण पोलीस लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती तहसीलदार अमृता साबळे यांनी दिली.