(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुका नाभिक समाज संघाची मासिक सर्वसाधारण सभा श्री.संत सेना महाराज मंदिर चव्हाण आळी,देवरुख) येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष वैभव रविंद्र भोसले हे होते. नाभिक संघाचे पदाधिकारी अभिजित चव्हाण सचिव सिद्धेश मोरे, खजिनदार संदिप अंब्रे व ज्येष्ठ नागरीक आदि नाभिक बांधव उपस्थीत होते.
यावेळी दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत सचिव सिद्धेश मोरे यांनी केले. यावेळी मागील सभेचे इतिवृत वाचन करण्यात आले. श्री. संत सेना महाराज यांची पुण्यतिथीचे नियोजन करण्यात आले. या चर्चेत अभिजीत चव्हाण, गोपिनाथ यादव, बाळकृष्ण चाव्हाण, नागेश यादव आदिनी चर्चा विनिमय केले. सलून ब्युटी पार्लर असोसिएशन मुंबई उपाध्यक्ष प्रशांत बदिरके यांनी संगमेश्वर तालुका नाभिक बांधवांची सभेत भेट घेऊन समाजातील सर्वागीण विकासाठी उपक्रम हाती घ्र्यावे असे सांगितले.यामध्ये पिक्नीक सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव, सलूनचे लायसन्स काढणे व जनगणना करणे, तसेच तालुक्यात व जिल्ह्यात नाभिक समाज एकसंघ व एकजुटीने असायला हवा असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.यांचे शाब्दिक स्वागत सिध्देश मोरे यांनी केले.
यावर्षी श्री. संत सेना पुण्यतिथीचे नियोजन करण्यात आले. पुण्यतिथी यावर्षी साधेपणाने करण्याचे सर्वानुमते या सभेत ठरविण्यात आले. तालुक्यातून पुन्यतिथी कार्यक्रमास शासकीय निमशासकीय निव्रुत्त व व्यापारी आदी सर्व बंधुभगिनिनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष वैभव भोसले यांनी उपस्थित बांधवांना केले. या सभेस तालुक्यातून माखजन, मुरडव, कडवई, साखरपा, संगमेश्वर, आंबवली, निवे आदि विविध गावातून बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार माजी सचिव दिनेश अंब्रे यांनी मानले.