(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठक बापू कांबळे यांच्या निवासस्थानी तालुकाध्यक्ष वहाब दळवी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. संगमेश्वर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे संघटन ध्येयधोरणे सभासद वाढवणे व संघातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
संगमेश्वर तालुक्यातील पत्रकार हा केवळ पत्रकार म्हणूनच कार्य करत नाही तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत असतो. समाजात होणारे अन्याय त्याचप्रमाणे अनुचित कार्य यास लगाम घालण्याचे कार्य पत्रकार करत असतो. त्या अनुषंगाने संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे कार्य तसेच शेतकरी शेतमजूर नोकरदार या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल यानुसार पत्रकार संघाचे कार्य करावे व समाजात एक आदर्श निर्माण करावा असा यावेळी ठरवण्यात आला.
यावेळी संगमेश्वर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले. संगमेश्वर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनुभवी पत्रकार मुजीब खान (कडवई) यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्ष वहाब दळवी (कसबा), सचिव उदय पवार (माखजन), सहसचिव दिनेश अंब्रे (संगमेश्वर), खजिनदार नियाझ खान (संगमेश्वर) यांची निवड करण्यात आली.
सदर वेळी प्रास्ताविक उदय पवार यांनी तर तालुका अध्यक्ष मुजीब खान यांनी मार्गदर्शन केले, तर आभार वहाब दळवी यांनी मानले.