(संगमेश्वर /मकरंद सुर्वे)
संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे रेवळवाडी येथे जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून तेथील रहिवाशी भीतीच्या छायेखाली आहेत. संगमेश्वर तालुक्यामध्ये गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे शेतीची तसेच पूरग्रस्त भागातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील रांगव येथील धरणाजवळ भेगा गेल्यानंतर शनिवारी पाच वाजण्याच्या दरम्याने तळेकांटे रेवळवाडी येथे जमिनीला मोठ्या भेगा पडल्या अचानक जमिनीला मोठ्या भेगा पडल्याने येथील रहिवासी भयभीत झालेले आहेत. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार गटविकास अधिकारी ग्रामसेवक सरपंच यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
याबाबत बोलताना सरपंच सुरेश गुरव म्हणाले की, शनिवारी सकाळच्या दरम्याने गावातील काही माणसे घराच्या वरील भागांमध्ये केली होती त्यावेळी त्यांना जमिनीला भेगा गेल्याचे दिसले त्यानंतर सदरच्या भागाबाबत कळल्यानंतर प्रशासन अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
याबाबत बोलताना स्थानिक ग्रामस्थ राजू कांडर म्हणाले की तिन्ही बाजूला क्रशर असल्याने आमच्या घरांना तडे गेले आहेत तसेच पिण्याचे नैसर्गिक स्रोत बदलले असून पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे तसेच रेवळवाडी येथील घटना कशामुळे झाली असावी असे सांगत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले.
फोटो – तळेकांटे रेवाळवाडी येथील जमिनीला गेलेल्या भेगा
(छाया : मकरंद सुर्वे, संगमेश्वर)