( संगमेश्वर )
संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे जांभूळवाडी येथील ग्रामदेवतेच्या महालक्ष्मी जाखमाता पावणाई देवींच्या शिमगोत्सवानिमित्त विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यकम शनिवार 4 मार्च ते 9 मार्चपर्यंत होणार आहे. यामध्ये पावणाई देवीच्या मंदिरात रुपे लावणे, रात्री 1 वाजता होळी तोडणे, रात्री 2 वाजता होळी आणणे, तसेच 5 मार्च रोजी दु. 2.30 वा महालक्ष्मी जाखमाता पावणाई मंदिरातून पालखी उठवणे व 4 वाजता होळी उभी करणे व संध्याकाळी 5 वाजता होम लावणे तसेच 6 वाजता सायंकाळी रामाच्या व राधाकृष्णाच्या मानाला जाते तेथून आल्यानंतर पालखी सहाणेवर बसते. 8 मार्च रोजी पालखी घरे घेणे व 9 मार्च रोजी पालखीचे शिंपणे असा कार्यकम होतो. तसेच रात्री नमनचा कार्यकम होणार आहे.