(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील नायशी बौध्दवाडी येथील बेपत्ता प्रौढाचा संगमेश्वर गडनदीपात्रात मृतदेह आढळला. अनिल तुकाराम जाधव (५५, नायशी बौध्दवाडी, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जाधव यांना दारुचे व्यसन होते. ते कामानिमित्त नायशी येथून कोंडिवरे कळंबुशी येथे येऊन जाऊन करत असत. १५ नोव्हेंबर रोजी अनिल जाधव हे घरातून निघून गेले होते. ते घरी परत न आल्याने मुलाने सावर्डे पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली. मात्र २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा. च्या दरम्यान गडनदीच्या पात्रात अनिल जाधव यांचा मृतदेह दिसून आला.
दत्ताराम झगडे यांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर नायशी येथे राहणारे रझाक मुल्ला यांना कळवले. त्यानंतर रझाक मुल्ला यांनी अनिल जाधव यांच्या मुलाला याची माहिती दिली. मुलाने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता वडिलांचाच मृतदेह असल्याचे त्याने ओळखले. याबाबतची पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.