(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे भरणकरवाडी येथील 40 वर्षीय विवाहिता झाल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद बेपत्ता विवाहितेचा पती चंद्रकांत पडवळ (कोळंबे भरणकरवाडी, कामानिमित्त मुंबई) यांनी दिली.
त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पत्नी चंद्रकला पडवळ (40) हिने 21 मे रोजी मैत्रिणीच्या लग्नाला पुणे येथे जात आहे असे फोन करुन सांगितले. 21 मे रोजी गेलेली पत्नी घरी न आल्याने त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र अद्यापपर्यंत घरी न आल्यामुळे पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार चंद्रकांत यांनी दिली. चंद्रकला यांची उंची 5 फुट असून रंगाने सावळया आहेत. अंगावर निळया रंगाचा टॉप, पांढरा पायजमा परिधान केला आहे. याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास संगमेश्वर पोलीस स्थानकात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.