(संगमेश्वर)
पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी कुळे गावातील विविध विकासकामांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये साळवी वाडी, मधली वाडी येथे गणेश विसर्जन घाट बांधणे, राव वाडी मुख्य रस्ता ते खडबडे वाडी रस्त्याचे डांबरीकरण करणे, चाळके वाडी येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे अशा अनेक कामांचा समावेश आहे.
या कामांचे भूमीपूजन संगमेश्वर तालुका प्रमुख श्री प्रमोद पवार, उप तालुका प्रमुख श्री मनोहर गुरव, विभाग युवा प्रमुख श्री सुधीर चाळके, सरपंच सौ सायली चांदे, उपसरपंच सौ.वैदही साळवी, विभाग प्रमुख नावडी जि.प.गट, श्री राजू साळवी, नावडी विभाग प्रमुख संजय खातू, माजी सरपंच सौ मेघा कदम आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवरूख शाखा प्रमुख श्री संदेश सावंत, स्वप्नील पेडांमकर कुळे गावाचे मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.