(संगमेश्वर)
संगमेश्वर करंबेळे मैल दगड येथील प्रवाशी शेड अनेक वर्षे प्रवाशांच्या उपयोगात नाही. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून याबाबत प्रवाशांच्याही तक्रारी येत आहेत. अनेक वर्षापूर्वी पाण्याचा निचरा व्हावा याकरिता मोठे गटार काढण्यात आले. परंतु प्रवाशांच्या सोयीची व्यवस्था करण्यापेक्षा त्यांच्या अडचणी कशा वाढतील याकडे संबंधित विभागाचे लक्ष असल्याचे बोलले जातं आहे. अधिकारी या मार्गावरून जात असूनही त्यांचे याकडे लक्ष नाही याचे आश्चर्य आहे. त्याचप्रमाणे स्थानिक प्रवासीही या मार्गावर प्रवास करीत असतात, मात्र त्याकडे ग्रामपंचायतचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहून वाहनाची वाट पहावी लागत आहे.
याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर माहिती देण्यात येणार असून त्वरित कार्यवाही करण्याबाबत अर्ज करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांनी कळविले आहे.