(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
कोकणातील तरुण कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. या तरुणांना कामाच्या दगदगीतून थोडासा विरंगुळा मिळावा आणि कोकणातील सर्व तरुण क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र यावेत यासाठी संगमेश्वर तालुक्यातील श्री गणेश सेवा मंडळ असुर्डे, पाताडेवाडी(रजि.) येथील मुंबईस्थित तरुणांनी दत्ताजी साळवी क्रीडांगण, घाटकोपर येथे प्रथमच ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या तरुणांनी मुंबईसारख्या मायानगरीत एक धाडसी निर्णय घेतला. या मंडळाचे अध्यक्ष विष्णू पाताडे, उपाध्यक्ष सुरेश डांगे, सर्व सहकार्यांनी उत्तम नियोजन व मेहनत घेतली. या स्पर्धेेसाठी असुर्डे मनवेवाडी, गुरववाडी, डिंगणी खाडेवाडी, करंडेवाडी जांबुळवाडी, करजुवे, संगमेश्वर, चिपळूण, देवरुख, रत्नागिरी येथील तरुणांनी आपापले संघ दिले होते. 21 व 22 मे रोजी पार पडल्या. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने श्री गणेश सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
या स्पर्धेत श्री गणेश चषकाचा प्रथम मानकरी ठरला तो भटवाडी घाटकोपर येथील स्वराज इलेव्हन संघ. या संघाला 25 हजार 25 रुपये व आकर्षक चषक देवून गौरवण्यात आले. तर द्वितीय चषकाचा मानकरी ठरला तो चिपळूणातील जय हनुमान फायटर सुर्वेवाडी संघ. या संघाला 15 हजार 15 रुपये व आकर्षक चषक देऊ न गौरवण्यात आले. तृतीय क्रमांक स्टार 11 फायटर सोलकरवाडी, डिंगणी. या संघाला 7 हजार रुपये व आकर्षक चषकाने गौरवण्यात आले. चतुर्थ क्रमांक लावण्या 11 गोरेगाव या संघाने पटकावला. या संघाला 5 हजार 50 रुपये व आकर्षक चषकाने गौरवण्यात आले.
बक्षीस समारंभप्रसंगी स.अभियंता नवघर शाखा वसई (पूर्व) श्री विकासभाई डांगे व सहकारी टीम चे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच स्थानिक नेते नगरसेवक श्री दिपक (बाबा)हांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. स्पर्धेला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यापैकी कोकणातील लोककला जपणारे तुरेवाले शाहीर श्री तूषार पंदेरे, संगमेश्वर तालुका शिवसेना संपर्कप्रमुख श्री प्रकश दुदम त्याचबरोबर श्री महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ (मुंबई) मंडळाचे उपसचिव सूनील मनवे, खजिनदार श्री सखाराम जोशी, सल्लागार प्रमोद मनवे उपस्थित होते.