(संगमेश्वर)
तालुक्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिरात 16, 17 आणि 18 डिसेंबर 2022 या कालावधीत श्री कर्णेश्वर देवस्थान आणि कलांगण संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने “श्री कर्णेश्वर महोत्सव” (कला – संगीत महोत्सव) आयोजित करण्यात आला आहे.
चालुक्य कालीन ११ व्या शतकातील शिल्प समृद्ध कर्णेश्वर मंदिरात हे कार्यक्रम होणार आहेत. प्राच्यविद्या अभ्यासकांसाठी, पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी श्री कर्णेश्वर देवस्थान आणि कलांगण संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने कला – संगीत महोत्सव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 16 ते 18 डिसेंबर या दिवशी होणाऱ्या या महोत्सवात नृत्य, वादन आणि गायन या कलांचा आविष्कार अनुभवता येणार आहे. संपूर्ण कर्णेश्वर मंदिर एल ई डी दिव्यांच्या उजेडात उजळून निघालं आहे. कला रसिकांसाठी पर्वणीच असेल.
या महोत्सवामध्ये प्रख्यात व्हायोलिन वादक श्रृती भावे, मुंबई यांचा व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम “श्रृती नाद”, नृत्य मल्हार कथ्थक अकादमी, चिपळूण प्रस्तुत “कला दर्पण” हा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम आणि श्री. चारुदत्त आफळे, पुणे यांची गायन मैफल अशा दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.