( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील मौजे नारडुवे मधली वाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलासह त्याचे आई वडील, आणि मुलीचे आई वडील अशा एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 17 मार्च रोजी घडली होती.
सविस्तर वृत्त असे की, मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असतानाही मुलाने दि 17 मार्च रोजी मुलीसोबत 2.39 वाजता लग्न लावून दिले. याबाबतची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात देण्यात आली. फिर्यादीत म्हटले आहे की, आंबेड बुद्रुक येथील मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही बालिकेचे वडील व आई यांनी मुलाचे वडील शंकर सोमा चांदीवडे, मुलाची आई संगिता शंकर चांदीवडे यांनी लपवून ठेवले. तसेच मुलगा सचिन शंकर चांदिवडे ( 29) याला सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्याशी लग्न केले. या सर्वांचे विरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.