संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडी येथील तरुणाच्या खूनाप्रकरणी अटकेत असलेल्या काकासह तीन आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी देवरुख न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडी येथील राकेश मनोहर सावंत या ३६ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना १२ रोजी उघडकीस आली होती. गुन्हा दाखल होताच काही तासातच पोलिसांनी याचा छडा लावत राकेश याचा चुलत भाऊ सुहास मोहन सावंत वय ३६ वर्षे, काका मोहन तुकाराम सावंत, वय ७२ वर्षे, आणि तिसरा नातेवाईक भुपेश चंद्रकांत सावंत, वय ३९ वर्षे सर्व रा. कोंडगाव, बाईंगवाडी, या तिघांना मंगळवारी १२ मे रोजी करण्यात होती. या तिघा आरोपीना देवरुख न्यायालयात हजर केले असता, त्यांना १७ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती. ही पोलीस कोठडी संपातच सोमवारी पुन्हा देवरुख न्यायालयात हजर केले असता त्या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप करीत आहेत.