(संगमेश्वर /सरेश सप्रे)
संगमेश्वर येथील बाजारपेठेची ख्याती तालुक्यातच नव्हे तर, रत्नागिरी जिल्ह्यात आहे. यामध्ये मे. प. ना. भिंगार्डे या व्यापारी पेढीचं नांव आघाडीवर आहे. दिवसेंदिवस व्यापाराच्या पद्धतीत झालेले बदल लक्षात घेऊन प. ना. भिंगार्डे पेढीने नवी धोरणं अवलंबली. आता तालुकावासियांच्या सेवेत प. ना. बाजार नावाने सेवा सुरू ४ वर्षापुर्वी केली. भिंगाई बंधूंचे हे दालन ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.
संगमेश्वरात प. ना. भिगांर्डे या व्यापारी पेढीचं नांव आघाडीवर आहे. दिवसेंदिवस व्यापाराच्या पद्धतीत झालेले बदल लक्षात घेऊन प. ना. भिगांर्डेनी १९३० साली आजोबांनी सुरू केलेल्या भिंगार्डे पेढीने नवी धोरण अवलंबली स्वातंत्र्यपूर्व व्यवसायाला १०० वर्षांचा इतिहास लाभलाय. भिगार्डे यांची चौथी पिढी या व्यवसात आधुनिकतेची कास धरत घट्टपणे पाय रोवून उभी आहे. एका शतकापूर्वी सर्वच परिस्थिती प्रतिकूल होती. मात्र, सर्व परिस्थितीवर व्यापाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नारायणशेठनी सुरू केलेला व्यवसायात दुकानात येणाऱ्या ग्राहकाला केवळ या असणारा मालच दिला असे नव्हे तर, ग्राहकाजवळ आपुलकीने संवाद साधत आपुलकीचा निर्मळ स्रोत ग्रामीण भागातील घराघरांत पोहचवला. आता आधुनिक काळात ग्राहक आणि व्यापारी यामध्ये एक नात जपण्याचं काम भिगांर्डे घराण्याने नेहमीच केले आहे.
चौथ्या पिढीतील त्यांची मुल गुरुप्रसाद ऊर्फ दादू, अतुल उर्फ भैय्या. योगेश ऊर्फ राजा यांच्याकडे असणाऱ्या कल्पकतेचा उपयोग करीत नवनवीन प्रयोग करणे सुरू केले. याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर मालाच्या पेंकिंग पद्धतीमुळे तत्पर सेवा देता येते, या अनुभवानंतर भिंगार्डे यांच्या चौथ्या पिढीने पं. ना. भिंगार्डे या ग्राहकाभिमुख लोकप्रिय पेढीचे पं. ना. बाजारमध्ये रूपांतर केले.
संगमेश्वर हे तसं ऐतिहासिक महत्व असलेले गांव शास्त्रीआणि सोनवी नदीच्या संगमावरील या गावाने अनेक थोर व्यक्तीमत्व पाहीली अशा व्यक्तीमत्वांनी संगमेश्वर नांव अगदी सातासमुद्रापार पोहोचवले. असंच एक नाव प. ना. भिंगार्डे पेढीचा व्यापार आज शतकाच्या वर पोचला आहे. आम्हाला आजवर मिळालेली ग्राहकांची साथ व आमच्या नवीन व जुन्या कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन व सहकार्य याच्याच जोरावर आम्ही आता प. ना बाजार या सुपर आणि अत्याधुनिक मार्केटची सुरवात केली, या सुपर मार्केटमध्ये ग्राहकांना गृहोपयोगी सर्व प्रकारच्या वस्तू योग्य दरात देताना आम्हाला अधिक आनंद होतो. ग्रामीण भागातील ग्राहक आमचे खरे दैवत. या ग्राहकांना आधुनिक मार्केटची सवय व्हावी यासाठी आम्ही या सुविधा ठेवली आहे. येथे येणारा ग्राहक खरेदी करून समाधानाने परतेल याची खबरदारी आम्ही घेत असतो. भिगार्ड यांची चौथी पिढीही ग्राहकांशी असणारे नाते जपत आहे.
व्यापारात त्यांनी नवनवे प्रयोग सुरू केले. स्वच्छ माल, वजन आणि वाजवी दर या त्रिसुत्रीने प.ना. बाजार घराघरांत आणि मोठमोठ्या हॉटेल आणि तत्सम व्यवसायिकात सर्वाधिक लोकप्रिय झाला. ग्रामीण जीवनाशी भिंगार्डे बंधू सर्वार्थाने एकरूप आणि समरस झाले.. त्यांच्या नावापुढे शेठ पद आले तरी भिगांर्डे परिवार सतत जमिनीवर असतात.त्यांचा स्वभाव सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे. तसेच शहराच्या धर्तीवर वस्तूदेण्याची सध्याची गरज लक्षात घेत प. ना. बाजार केवळ संगमेश्वरवासींयासह संपूर्ण तालुकावासियांची खरी गरज बनली आहे. तसेच चिपळूण तालुक्यातही या कंपनीचे महालक्ष्मी एजन्सी आणि में. पी.एन.बी नावाने दोन दालने सुरु करत एजन्सीचा विस्तारही वाढवला आहे.
व्यापाराबरोबर समाजकारणाची आवड असल्याने या सर्वांचा एक पाय दुकानात तर दुसरा समाजकार्यासाठी असतो. विविध सामाजिक कार्यात हातभार लागतो. अशा या शताब्दी पार केलेल्या व प. ना. बाजारापर्यंत भरारी घेतलेल्या भिगांर्डे परिवाराला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!