( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथील 40 वर्षीय तरुणाने नोकरी नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना 3 जुलै रोजी सायं. 6 वा. च्या सुमारास घडली. विजय शांताराम बाटे (40, मुरडव, बाटेवाडी, संगमेश्वर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद वडिल शांताराम बाटे यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा पूर्वी मुंबई येथे नोकरीला होता. त्यानंतर दोन वर्षापूर्वी त्याची मुंबईतील नोकरी सुटल्याने तो गावीच रहात होता. नोकरी गेल्याच्या नैराश्यातून तो कुठेही फिरत असे. त्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता. 3 जुलै रोजी त्याने चिपळूणमधील खेरशेत येथे रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली.