करोनाच्या दुसर्या लाटेत देशभरात हलकल्लोळ माजवला असताना ‘निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप’तर्फे संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली मालपवाडी गावातील ग्रामस्थांना आरोग्यविषयक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. या वस्तूंमध्ये वाफेचे मशिन (स्टीमर), स्टीमरमधील गोळ्या आणि सॅनिटायझर यांचा समावेश होता.
करोनाच्या दुसर्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी दिवंगत समाजसेवक फिरोज असगरअली कोठालिया यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते दिनकर पाटील आणि राकेश मिन यांच्याकडून ही मदत करण्यात आली. अंत्रवलीच्या मालपवाडी येथे झालेल्या या सामाजिक उपक्रमात ठाणे येथील पत्रकार व फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, पोलीस पाटील सुरेश तावडे, गावचे गावकर कृष्णा मालप आदी उपस्थित होते. या कामी संतोष कांबळे, गणपत दाभोळकर, तेजस सुर्वे, अनंत माईन, नरेंद्र खानविलकर, संजय मालप आदींचे सहकार्य लाभले.