(खेड / भरत निकम)
खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरिब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
मंगळवार दि. २२ ते २७ ऑगस्ट या कालावधीत खेड आणि दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील गरिब व गरजू विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. यावर्षी लोटे, बोरज नं. १ व शेवरवाडी, निगडे गावठण व बारकोंबडा, तिसंंगी हायस्कूल, बिजघर- कुदळवाडी व कोंडवाडी, बहिरवली, तळे- झोळीचीवाडी, धनगरवाडी, मांडवे-गावठण व कोसमवाडी, वाडी जैतापूर, पुरे खुर्द, देवघर- वाक्षेपवाडी, विद्यामंदिर व निवाचीवाडी, तळे- जांभूळ वाडी, देऊळवाडी व तळे येथील कला व वाणिज्य महाविद्यालय येथे गरजेनुसार शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला राजेंद्र तांबट, श्री. जंगम, विक्रांत सकपाळ यांनी विशेष सहकार्य करीत मेहनत घेतली आहे.
संकल्प या संस्थेमार्फत १९९४ पासून शैक्षणिक विद्यार्थ्यांना प्रथम एससीसी व्याख्यानमाला घेतली होती. गरिब आणि गरजू महिलांना घरगुती साहित्य वाटप केले होते. जेष्ठ नागरिकांना मोफत ओळखपत्र वाटप केली. गरिब आणि गरजू मुलांना शैक्षणिक साहित्यासोबत शाळांना संगणक संच मोफत उपलब्ध केले होते. तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असून गरिबीमुळे पुढील शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक फि भरुन त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका संच शाळांना मोफत पुरविल्या जातात.
२०१० पासून शहरापासून दूर असलेल्या दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजेनुसार संगणक, प्रिंटर, होतकरु विद्यार्थ्यांची फि भरली जात आहे. शैक्षणिक कामात नेहमी हातभार देणाऱ्या या संस्थेने ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालनं खूले करुन दिले आहे. दरवर्षी आवडीने शैक्षणिक साहित्य आवश्यकतेनुसार आणून त्याचे नियोजन करुन वाटप केले जाते.